सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी येथे भारतीय कापूस निगम (C.C.I) च्या खरेदी केंद्राचा शुभारंभ ता. १२ डिसेंबर शुक्रवाराला सकाळी ११.३० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. मे. वासुदेव जिनिंग अँड प्रेसिंग, सिंदी येथे झालेल्या या कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन समितीचे सभापती केशरीचंदजी खंगारे यांच्या हस्ते करण्यात आले. शुभारंभाच्या या प्रसंगी पहिला कापूस विक्री करणारे शेतकरी मोहन झिलपे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.