जालना: महिलांच्या जीवनात सकारात्मक क्रांती घडविणारी प्रेरणादूत
Jalna, Jalna | Apr 22, 2026 केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृतीतून समाजपरिवर्तन कसे घडवता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जालना येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि बालकल्याण समितीच्या सदस्या सौ. विद्या लंके-कानडे. गेल्या दोन दशकांपासून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे पेरण्याचे काम त्या सातत्याने करत आहेत. त्यांच्या निष्ठेमुळे आज हजारो महिला उंबरठा ओलांडून आत्मनिर्भरतेच्या वाटेवर चालू लागल्या आहेत.. बचतगटांतून फुलाली आर्थिक क्रांती सौ. विद्या लंके-कानडे यांच्या कार्याची पायाभरणी महिला ब