शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीत घुसले पाणी, पोलिसांना पाय ठेवणे कठीण झाले
Beed, Beed | Sep 27, 2025 बीड शहरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका पोलीस विभागालाही बसला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने कागदपत्रे, महत्त्वाची नोंदी व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे ठाण्याच्या परिसरात पाणी साचले होते. हे पाणी थेट इमारतीत घुसल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला. नोंदी ठेवण्याची कागदपत्रे, गुन्हे तपासाशी संबंधित फाईल्स तसेच संगणक व इतर कार्यालयीन साहित्य पाण्यात भिजले.