बारामती: सुप्यात तरुणीची अमानुष हत्या करून मृतदेह नग्न अवस्थेत फेकला रस्त्यावर
Baramati, Pune | Jan 20, 2026 बारामती तालुक्यातील सुपा परिसरात एका 25 ते 27 वर्ष वयोगटातील तरुणीची अत्यंत अमानुषपणे हत्या करून तिचा मृतदेह नग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.सुपे गावालगत असलेल्या काळखरेवाडी हद्दीतील खैरेपडळ परिसरात सोमवारी (ता. 19) पहाटे हि घटना उघडकीस आली आहे.