गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस युवकांना संधी देणार-माजी आमदार राजेंद्र जैन,अग्रसेन भवन येथे राष्ट्रवादी पक्षाची बैठक संपन्न
Gondiya, Gondia | Oct 16, 2025 खा.प्रफुल पटेल यांचे व्हिजन हे सर्वांगीण विकासाचे आहे. गोंदिया शहरातील प्रलंबीत समस्याचे निराकरण व शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे सर्व युवा कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, युवक जर पुढे आले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच अधिक मजबूत आणि प्रभावी पक्ष म्हणून उभा राहील असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले. अग्रसेन भवन, गोंदिया येथे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयोजित युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा बैठक झाली.