नागपूर शहर: हवामान खात्याने पुढील तीन तास दिला जोरदार पावसाचा इशारा, नागपुरात दमदार पाऊस सुरू काही भागातील बत्ती गुल
हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात पुढील तीन तासात विजाच्या कडकडाटासह दमदार पावसाचा इशारा दिलेला आहे. या इशाराप्रमाणे नागपूर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून काही भागातील बत्ती देखील गुल झाली आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान नागपूर शहरात ठिकठिकाणी पाणी साचले.