रावेर तालुक्यात पाल हे गाव आहे. या गावातून खरगोन जाणाऱ्या रोडवर मोरव्हाल फाटा आहे. या फाट्याच्या वळणावर स्कूल बस क्रमांक एम. एच.१९ सी.वाय.७९११ घेऊन संतोष राठोड जात होता. भरदा वेगात त्याने दुचाकी क्रमांक एम.पी.१० झेड. जे.११३८ घेऊन जात असलेल्या वनसिंग भिल वय ३४ याला धडक दिली त्यात हात तरुण ठार झाला. तेव्हा या अपघात प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.