सुरत महामार्गावर साक्री तालुक्यातील दहिवेल गावानजीक एका हॉटेल समोर एम.एच. १५ जी. ७७८८ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिल्याने सातारपाडा ता. साक्री येथील दुचाकीवर बसलेला (वय ४४ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी ३ वाजता हा अपघात झाला. याप्रकरणी साक्री पोलिसात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.