अकोला: दिल्लीतील बॉम्बस्फोटातील शहीदांना गांधी चौकात शिवसेनेची श्रद्धांजली — आतंकवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी
Akola, Akola | Nov 11, 2025 दिल्लीतील भीषण बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) अकोला जिल्हा व शहर पश्चिमतर्फे गांधी चौकात दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मेणबत्ती प्रज्वलन कार्यक्रम झाला. जिल्हाप्रमुख अश्विन नवले व शहरप्रमुख रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी दोन मिनिटे मौन पाळून आतंकवादाचा तीव्र निषेध केला. उपस्थितांनी केंद्र सरकारकडे दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. “भारत माता की जय” आणि “दहशतवाद मुर्दाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.