नागपूर शहर: किरकोळवादातून शस्त्राने वार ; भर दिवसा पाचपावली येथे घडली थरारक घटना
नागपूर शहरात खुनाचे सत्र सुरू असतानाच पाचपावली हद्दीतूनही एक खळबळ जणक घटना समोर आली आहे. एक नोव्हेंबरला दुपारी मिळालेल्या माहितीनुसार आज दिवसाढवळ्या किरकोळ वादातून पाचपावली हद्दीत एकाने दुसऱ्यावर चक्क शस्त्राने वार केला जात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीचे नाव घनश्याम शाहू वय 40 वर्ष असे सांगण्यात आले आहे. दिवसाढवळ्या नागरिकांची चहल पहल असताना ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे