जालना: समृद्धी महामार्गावर गॅस गळतीमुळे 5 किमी वाहनांच्या रांगा; पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली; प्रवासी तासन्तास अडकले
Jalna, Jalna | Apr 8, 2026 गतिमान प्रवासासाठी ओळखल्या जाणार्या समृद्धी महामार्गावर गॅस गळतीच्या घटनेमुळे मोठा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. जालना एक्झिट पॉईंटजवळ जामवाडी शिवारात नायट्रोजन गॅस वाहून नेणार्या टँकरला अपघात झाल्याने महामार्गावर तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकार्यांनीही घटनास्थळी भेट दिली. टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.