नाशिक: मम सुखाची ठेवने मंत्रमुग्ध केले रसिकांना
बालगंधर्वांच्या अजरामर नाट्यगीतांची स्वरांजली
Nashik, Nashik | Nov 5, 2025 मम सुखाची ठेव” या विशेष नाट्यसंगीत कार्यक्रमाने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी मंजुषा पाटील यांच्या स्वरांमधून सादर झालेल्या बालगंधर्वांच्या अजरामर नाट्यगीतांनी सभागृहात उपस्थित संगीतप्रेमींच्या मनात भावनांची लहर निर्माण केली. पुण्याच्या प्रख्यात वादक प्रसाद जोशी (साथसंगत) आणि पखवाज वादक प्रथमेश तारळकर यांच्या सुरेल साथीनं कार्यक्रम अधिक खुलला. यावेळी “पंचतुंड”, “बलसागर”, “मम आत्मा”, “मम सुखाची”, “मधुकर वन”, “धावत येई सख्या”, “आदी गाणी झाले.