अमरावती: अमरावतीत ढगाळ वातावरणामुळे विमान लँड न होताच हवेतूनच मुंबई कडे परतलं, नाईट लँडिंग नसल्याने प्रवाशांची दुरावस्था
अमरावतीचे बेलोरा विमानतळ सुरू झाले आहे. अमरावतीहून मुंबई ही आठवड्यातून तीन दिवस प्रवासी वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र ती सेवा काहीनाकाही कारणांमुळे सतत अनियमित होत आहे. सोमवारी सायंकाळी मुंबईतून अमरावतीला प्रवासी घेऊन आलेले विमान अंधुक प्रकाशामुळे बेलोरा विमानतळावर ‘लँड’ होऊ शकले नाही. त्यामुळे मुंबईतून आलेले प्रवासी अमरावतीत न उतरता पुन्हा मुंबईत परत गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.