नांदेड: शहरातील छत्रपती चौक रोडवर कारमध्ये अवैध विदेशी दारू पोलीसांनी पकडली; आरोपीवर भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Nov 1, 2025 नांदेड शहरातील छत्रपती चौक रोडवर दि 31 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 14:40 वाजेच्या सुमारास यातील आरोपी दीपक देसाई वय 23 वर्ष हा विनापरवाना बेकादेशीर रित्या आपले ताब्यातील कार क्रं एमएच २२ एडब्ल्यू 1442 किमती 4 लाख रुपयाचे यामध्ये विदेशी दारू किमती 610 रुपयाचा मुद्देमाल चोटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी दुपारी भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू आहे.