चंद्रपूर: चंद्रपूर- घुग्गुस मार्गावरील पांढरकवडा येथे बँक ऑफ महाराष्ट्र चे ATM अज्ञातांनी फोडले
चंद्रपूर- घुग्गुस मार्गावरील पांढरकवडा येथे बँक ऑफ महाराष्ट्र चे ATM अज्ञातांनी फोडले, सदर घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असून आज दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. पांढरकवडा हे सतत सुरू असलेला रहदारीचा मार्ग आहे, पैसे काढण्यासाठी बँकेत न जाता नागरिक थेट या ATM मशीनचा वापर करीत पैसे काढतात.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांची या मार्गावर वर्दळ कमी होती, याचा फायदा घेत अज्ञातांनी सदर मशीन फोडत काही रक्कन लंपास केली असल्याची माहिती आहे.