चंद्रपूर: नवरात्रोत्सव परवानगीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेची एक खिडकी सुविधा
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सवासाठी एक खिडकी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडुन परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे असल्याचे आज दि 16 सप्टेंबर 12 वाजता मनपा तर्फे कळविण्यात आले आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना असुन 1 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे.