पालघर: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त केळवे येथील शितलादेवी मंदिरात दिपोत्सव साजरा
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध केळवे येथील शितलादेवी मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. केळवे येथील शितलादेवी मंदिर परिसर व मंदिरासमोर असलेल्या कलावा काठी गावकऱ्यांनी एकत्रित येत पारंपरिक पद्धतीने तेलाचे दिवे लावले. हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात शितलादेवी मंदिराचा संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला.