नागपूर शहर: पोलीस भवन येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या निरोप समारंभ तसेच पुस्तक विमोचन कार्यक्रमाचे आयोजन
पोलीस भवन येथे आज पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या निरोप समारंभाचे तसेच पुस्तक विमोचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या एकूण 17 अधिकारी आणि अंमलदार यांना सपत्नीक भावपूर्ण निरोप देण्यात आला तसेच पोलीस उपायुक्त नित्यानंद झा व त्यांची पत्नी श्रीमती आयुषी सिंग यांच्या संयुक्त लिखित इंडियन सोसायटी नामक पुस्तकाच्या आवृत्तीचे अनावरण देखील पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते झाले.