बागलाण: सटाणा कांद्याच्या चाळीतून उमटल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, कांद्याच्या माध्यमातून साकारले अनोखे ‘लक्ष्मीपूजन’
Baglan, Nashik | Oct 21, 2025 सटाणा कांद्याच्या चाळीतून उमटल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, कांद्याच्या माध्यमातून साकारले अनोखे ‘लक्ष्मीपूजन’ आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता दिपावलीचा सण व लक्ष्मीपूजन सटाणा तालुक्यातील व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी आगळ्या - वेगळ्या पद्धतीने साजरा केला.आपल्या शेतातील कांद्याच्या चाळीत त्यांनी ‘लक्ष्मीपूजन’ नाव कांद्याच्या साहाय्याने साकारले आणि त्यातून आर्थिक स्थिती आणि बाजारभावाच्या चढउतारांमुळे निर्माण झालेली संकटे किरण मोरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना मांडल्या