एमआयडीसीच्या विस्तारासाठी चिंचोली गावातील शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोधावर शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली. योग्य मोबदला मिळाल्यासच जमीन देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. यावर पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांसोबत साकारात्मक चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी जमीन मोजण्यास सहमती दिली आहे. अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.