जालना: भंगारात भेसळ करून लाखोंचा अपहार; चंदनझीरा पोलीस ठाण्यात चार एजंटांविरुद्ध गुन्हा
Jalna, Jalna | Jun 24, 2026 स्टील कंपनीसाठी खरेदी करण्यात आलेल्या उच्च प्रतीच्या भंगार मालात भेसळ करून त्यातील मौल्यवान भंगार काढून घेत अंदाजे 9 ते 10 टन मालाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवार दि. 24 जून 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी चार एजंटांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अक्षय परमहंस सिंह रा. माणिकनगर, संभाजीनगर, जालना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते ओम साईराम स्टील अँड अलॉयज प्रा. लि. कंपनीत व्यवस्थापक व भंगार खरेदी अधिकारी आहे.