नायगाव-खैरगाव: देवा आता तुच वाचवं रे बाप्पा आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच वाली नाही..बळेगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा Video Viral
आज सोमवारी सायंकाळी समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नुसार नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे बळेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले असुन शेतातील सोयाबीन पिकांसह इतर पिकांचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये शेतातील साचलेल्या पाण्यात उभे राहून नुकसानग्रस्त शेतकऱ्याने देवा आता तुच वाचवं रे बाप्पा आता तुझ्याशिवाय शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही म्हणत शासनाकडे मदत मागीतली आहे.