नगर: तिसगाव परिसरात पुन्हा पूरस्थिती; बचाव कार्य सुरू
तिसगाव परिसरात आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे येथील ओढ्या नाल्यांना पुन्हा पूर आला आहे. तिसगाव व परिसरात प्रशासनाकडुन NDRF च्या सात तुकड्या तातडीने मागवण्यात आल्या आहेत. थोड्याच वेळात या तुकड्या तिसगाव परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल होणार आहेत. जनतेने सावधानता बाळगावी व घाबरून जाऊ नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.