देवणी: विद्यार्थ्यांनी वकिलीक्षेत्राबरोबरच न्यायदानाच्या क्षेत्रात यावे – न्यायमूर्ती मंगेश पाटील
Deoni, Latur | Dec 1, 2025 दयानंद विधी महाविद्यालय, लातूर येथे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील, अध्यक्ष—महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई—यांच्या प्रमुख उपस्थितीत संवादात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीश म्हणून काम करताना शिस्त आणि प्रामाणिकता हे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत असे त्यांनी सांगितले. तरुण विद्यार्थ्याना वकिली क्षेत्राबरोबरच न्यायपालिकेमध्ये न्यायाधीश म्हणून कार्य करण्यासाठी खूप संधी आहे असे मत त्यांनी मांडले.