जालना: मौजपुरीत सामाजिक ऐक्याचे दर्शन; हज यात्रेसाठी शेख चांद शेख शब्बीर यांना सर्वधर्मीयांकडून पेढे भरवून शुभेच्छा
Jalna, Jalna | Apr 23, 2026 मौजपुरी गावात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. गावातील आदरणीय व्यक्तिमत्व शेख चांद शेख शब्बीर यांची हज यात्रेसाठी निवड झाल्याने सर्व धर्मीय ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांचा सत्कार केला आणि पेढे भरवून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. गुरुवार दि. 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शेख चांद शेख शब्बीर यांना यात्रेसाठी निरोप देताना गावात उत्साहाचे वातावरण होते. यावेळी विष्णू बळप, बालाजी बळप, कृष्णा हिवाळे, कृष्णा बळप आदी उपस्थित होते.