तेल्हारा: हिवरखेड येथील नगर पालिका प्रभाग रचनेवर वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल लवकरच होणार सुनावणी
Telhara, Akola | Oct 21, 2025 तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील नगरपालिका प्रभाग रचनेवर आता वाद उचलून आला. दरम्यान याबाबत शासनाने ठरवलेल्या निकषाकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली असल्याचा आरोप याचिकाकरिता वंदना वानखडे यांनी केला आहे यावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून सर्वत्र एकत्रित याची लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे.