नांदेड: बडपुरा येथील मोकळ्या जागेत तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना 4 आरोपी 5 हजार 320 रूपयांच्या मुद्देमालासह मिळुन आले
Nanded, Nanded | Nov 1, 2025 नांदेड शहरातील बडपुरा येथील मोकळ्या जागेत दि 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास यातील आरोपी नामे 1) निशानसिंघ संधु 2) मनिंदरसिंघ गाडीवाले 3) लखणसिंघ खालसा 4) मनमत मंगरूळे हे विनापरवाना बेकदिश रित्या तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना नगदी 5320 रुपयांचे मुद्देमाला सह पोलिसांना मिळून आले या प्रकरणी फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल गव्हाणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजीराबाद पोलीस स्टेशन येथे आज दुपारी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.