जालना: जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रिमझिम पावसाची हजेरी
उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
Jalna, Jalna | May 9, 2026 जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रिमझिम पावसाची हजेरी उकाड्यापासून नागरिकांना दिलासा आज दिनांक 9 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लगावलीये.. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंशांवर जाऊन पोहचला होता. त्यातच आज सकाळच्या वेळेला जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लगावली.. जिल्ह्यातील मंठा, परतूर, जाफराबाद तालुक्यासह विविध भागात रिमझिम पाऊस पडला आहे. त्यामुळं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय..