गोंदिया: डव्वा येथे अश्लील शब्दात शिवीगाळ करून मारपीट, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Oct 18, 2025 दि. 14 ऑक्टोंबर च्या रात्री 8:00 वाजेच्या सुमारास ग्राम डव्वा येथे फिर्यादी दुर्गेश बाबुलाल कटरे हा आपल्या घरासमोर बसला असता यातील आरोपी टेकचंद बघेले याने फिर्यादीला पाहून बोलला की, तुम्हाला योजनेचा फायदा मिळाला तर मला का नाही असे बोलून अश्लील शब्दात शिवीगाळ करून मारपीट करण्याची धमकी दिली. दिनांक 17 ऑक्टोंबर च्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.