आज दिनांक 5 सप्टेंबर सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर .मालेगाव येथे चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर शहरात सकल सोनार समाजाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले. या प्रकरणात सरकार पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी तीव्र निशाणा साधला. “लाडकी बहीण योजना नको, महिला सुरक्षितता योजना काढा” असा घराघात टोला देत महिलांनी शासनाकडून तातडीने कठोर कारवाईसह पीडितेला न्याय देण्याची जोरदार मागणी केली.