जालना: दुहेरी तारणातून कोट्यवधींची फसवणूक; तिघांविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Apr 10, 2026 जालना येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना यांची दुहेरी तारणातून कोट्यावधीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने तिन जणाविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कर्ज फसवणुकीप्रकरणी मुख्यवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता, त्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने वसुली व्यवस्थापक नामदेव रामभाऊ तांबे यांनी तक्रार दिली.