चांदूर बाजार: चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे, अवैध रेती वाहतूक करणाऱ्या डंपर वर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
आज दिनांक 13 नोव्हेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक बारा नोव्हेंबरला २ वाजून ४१ मिनिटांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई करून, डंपर चालक किसन गजानन धुर्वे, हेल्पर राजेश बलदेव बहुरूपी, डंपर मालक नरेंद्र धानोरकर याचे वर गुन्हा दाखल करून 35 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ब्राह्मणवाडा पोलिसांकडून सुरू आहे