अतिवृष्टी अनुदानाचा विलंब; २७ हजार शेतकऱ्यांचा संताप, ३ नोव्हेंबरपासून साखळी उपोषणाचा इशारा दिलाय अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या सुमारे ३२ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ ५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यातच अनुदान जमा झाले आहे. उर्वरित २७ हजार शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने संताप वाढला आहे. शासनाकडे निधी नसल्याची चर्चा असून काही कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. २ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी हजर राहावे.