भोकरदन: आव्हाना येथे जुगार अड्ड्यावर भोकरदन पोलिसांचा छापा,1लाख 43 हजार300 रुपयांचा मुद्देमाल जप्त,9जणांवर गुन्हा दाखल
आज दिनांक 27 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पोलीस ठाणे हद्दीत आव्हाना येथे शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत एक लाख 43 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत नऊ जणांवर जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई पोलीस कर्मचारी उमेश टेकाळे व त्यांच्या इतर सहकार्याने पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या आदेशावरून केली आहे.