जालना: अंबड-शहागड रस्त्यावर दोन बसेसची समोरासमोर धडक; 25 ते 30 प्रवासी जखमी; जखमींना रुग्णालयात हलविले
Jalna, Jalna | Jul 4, 2026 अंबड-शहागड रस्त्यावरील शहापूर येथील गल्हाटी नदीच्या पुलावर शनिवारी दि. 4 सकाळी 10 हाजता मिळालेल्या माहितीनुसार दोन बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात अंदाजे 30 ते 40 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, जखमींना तातडीने अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी 9 ते 9.30 वाजेच्या सुमारास अंबड-शहागड मार्गावरील शहापूर येथील गल्हाटी नदीच्या पुलावरून जात असताना घटना घडली.