अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाचा 'गलथान' कारभार; बाळंतपणादरम्यान नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू :तालुक्यातील धानोरा (खुर्द) येथील एका २३ वर्षीय नवविवाहितेचा पहिल्या बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.