महाड: पनवेल महापालिकेची अभय योजना : शास्तीवर ७५% सवलतीची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढ
Mahad, Raigad | Dec 1, 2025 पनवेल : मालमत्ता कर थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या वाढत्या आग्रहास्तव पनवेल महानगरपालिकेने अभय योजनेंतर्गत शास्तीवर मिळणारी ७५ टक्के सवलत देण्याची अंतिम व शेवटची मुदत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविली आहे. महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकबाकीदारांनी मुदतवाढीची मागणी केली होती. नागरिकांना कर भरण्यास अंतिम संधी मिळावी आणि मनपाचे महसूल संकलन वाढावे, यासाठी ही मुदतवाढ