जालना: भीम पार्क व विपश्यना केंद्राचा प्रस्तावाची शिवसेना नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्याकडे धाव
Jalna, Jalna | Jul 20, 2026 जालना शहरातील बहुचर्चित भीम पार्क व विपश्यना केंद्र उभारणीचा विषय जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. शहराच्या विकासाशी आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या विषयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नगरसेवकांनी थेट महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडे जाब विचारला. सर्वसाधारण सभेदरम्यान नगरसेवक निखिल पगारे, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेविका