उत्तर सोलापूर: सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खेळबुडे यांची तेराव्यांदा बिनविरोध निवड...
रविवारी सकाळी 11 वाजता सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी विक्रम खेळबुडे यांची सलग तेराव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी सागर सुरवसे आणि खजिनदारपदी किरण बनसोडे यांचीही पुनःश्च एकमताने (बिनविरोध) निवड झाली. संघाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असून, नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.