नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने से.1 नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण तसेच से.15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात मायक्रोबायलॉजी प्रयोग शाळेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, बेलापूर विधानसभा सदस्य मंदा म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, माजी खासदार डॉ.संजीव नाईक, शहर अभियंता शिरीष आरदवाड, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, माजी महापौर जयवंत सुतार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.