वाई: काशिनाथाचे चांगभलेच्या जयघोषात भैरवनाथ मंदिर मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी नांदेडमधून दगडी दाखल; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक
Wai, Satara | Sep 6, 2025 काशिनाथाचे चांगभलेच्या जय घोषात वाई तालुक्यातील बावधन भैरवनाथ मंदिर या मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी नांदेडमधून दगडी शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दाखल झाल्या. बावधनकरांनी सायंकाळी पाच वाजता भैरवनाथाच्या वाद्यावर मिरवणूक काढून मंदिरात पूजन केले व कामास सुरुवात केली. बावधन गावचे ग्रामदेवत श्री भैरवनाथ असून सर्व जाती-जमातीतील लोक बगाड हा या देवतेचा वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. हा उत्सव गेली कित्येक वर्षे परंपरेने साजरा होतोय.