जालना: जालना शहरातील मोठ्या नाल्यांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष? पावसाळ्यापूर्वी नागरिकांमध्ये चिंता
Jalna, Jalna | May 13, 2026 जालना : पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना जालना शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई अद्याप पूर्णपणे सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडाझुडपांचे अतिक्रमण साचल्याने पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या घरांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील अनेक भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडतात. मात्र यावर्षीही अद्याप मोठ्या नाल्यांची प्रभावी साफसफाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला ज