15 जानेवारीला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीतील इंदिरानगर येथे राहणारा कुख्यात आरोपी मुकुल उर्फ टिक्या संजय पडोळे त्याच्याविरुद्ध विविध गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून देखील त्याच्या कृत्यात सुधारणा झाली नाही त्यामुळे पोलीस आयुक्त यांनी आरोपीला स्थानबद्ध करण्याचे आदेश केले असून कार्यवाही पूर्ण होईपर्यंत आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे ठेवण्यात आले आहे