सायबर पोलिस ठाणे, बीड येथे ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार मीनाक्षी दत्ता आंधळे, रा. हिंगणी, तालुका जिल्हा बीड यांच्या बँक खात्यातून मोबाईल व सिमकार्डचा गैरवापर करून 1 लाख 33 हजार 955 रुपये ऑनलाइन फसवणूक करून काढण्यात आले होते.तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व बँक माहितीच्या आधारे तपास करत आरोपींकडून 89 हजार रुपये जप्त केले. ही रक्कम आज गुरुवार दि 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता, उपविभागीय पोलीस अधिकारी बीड पूजा पवार यांच्या हस्ते