मध्यप्रदेशातील गुन्ह्यातील एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या आणि जळगाव जिल्ह्यासह इतर राज्यांत चैन स्नॅचिंगचा धुमाकूळ घालणाऱ्या 'इराणी टोळी'वर जळगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात राबवलेल्या 'कोंबिंग ऑपरेशन'मध्ये पोलिसांनी ४० लाख २५ हजार रुपये किमतीचे सोने, एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि १६ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दिली.