वरोरा: अवैध रेती उपसा करताना आष्टा येथील नदीपात्रात इसमाचा अपघाती मृत्यू !
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टा या ठिकाणी काल दि.21 च्या रात्रीच्या 9 वजताच्या सुमारास परिसरातील काही रेती तस्कर अवैध उपसा करण्यासाठी गेले असता चिमूर तालुक्यातील खांबाळा येथील रहिवाशी प्रमोद शरकुरे वय वर्ष 34 याच्या घटनास्थळावर मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शेगाव पोलीस घटनास्थळ पंचनामा करून प्रेत उत्तरणी तपासणीसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठविण्यात आले असून शेगाव पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.