अकोला: दिवाळीसाठी झेंडू फुलांना दुप्पट मागणी; बाजारात दर ८० ते १२० रुपये किलो
Akola, Akola | Oct 19, 2025 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांची मागणी दसऱ्याच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. त्यामुळे दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत बाजारात मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुलांची दुकाने उभारली गेली असून, फुलांचे दर ८० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. सजावटीसाठी झेंडू फुलांची वाढती मागणी लक्षात घेता, व्यापाऱ्यांनी पुरवठाही वाढवला आहे.