सातारा: ब्रह्मपुरी आश्रम शाळेत अनिष्ट अघोरी रूढी प्रथा परंपरा तीन दिवसीय अभियान संपन्न
Satara, Satara | Sep 21, 2025 संस्कारक्षम वयातच विद्यार्थ्यांनी केवळ विज्ञान व तंत्रज्ञान याचे धडे घेऊन विज्ञानाची सृष्टी वापरून केवळ तांत्रिक प्रगती होईल,पण खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार निरीक्षण तर्क अनुमान प्रचिती या तत्त्वानुसार अंगीकारला तर पुढील पिढी प्रगतीपथावर जाईल. भारतीय घटनेमध्ये आणि शिक्षणाच्या मूल्य गाभा घटकात असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन केवळ पुस्तकात राहून चालणार नाही तो प्रत्यक्ष आचरणात आला पाहिजे असे 3दिवसीय अनिष्ट अघोरी प्रथा निर्मूलन या वैज्ञानिक जाणीव देणाऱ्या अभियानात सांगितले.