अकोला: जुने शहरातील ३२० वर्ष पुरातन श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त पहाटे महापूजा संपन्न
Akola, Akola | Jul 6, 2025 अकोल्याच्या जुने शहरातील ३२० वर्ष पुरातन श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त पहाटे महापूजा संपन्न झाली. यंदाही श्री. विठ्ठल मंदिर अखंड हरीनाम सप्ताह मंडळाचे सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा व सौ अर्चना शर्मा यांचे हस्ते विधिवत अभिषेक पूजा संपन्न करण्यात आली. विठ्ठल मंदिर येथे मागील गेल्या 92 वर्षांपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते, आषाढीला भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येऊन पंचक्रोशीमधील भावीक दर्शनाला गर्दी केली होती.