परभणी: नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिवाळीपूर्वी निश्चित मदत मिळणार ; पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची संपर्क कार्यालय येथे माहिती
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना संकटाच्या या काळात मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून या पॅकेजनुसार जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील आपदग्रस्त शेतकर्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार अशी माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.